‘जळगाव प्रकरणातील आरोपींना त्वरित कठोरात कठोर शिक्षा द्यावी’ – पंकजा मुंडे

0
80

जळगाव येथील सरकारी वस्तीगृहातील मुलींसोबत करण्यात आलेला अत्याचार अत्यंत किळसवाणा आहे. यात सरकारी अधिकारीही सामील असल्याचे समजते. यातील आरोपींना त्वरित कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.जळगाव येथील शासकीय आशादीप महिला वस्तीगृहात पोलिसांनीच तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सदरील घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असुन जिल्हाधिकार्‍यांकडे या संबंधी तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिस कर्मचारी आणि वस्तीगृहाबाहेरील कांही पुरूष सहभागी असल्याचा आरोप असुन जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेशही दिले आहेत. या प्रकरणाचे विधीमंडळात देखील गंभीर पडसाद उमटले आहेत.दरम्यान, याबाबत पंकजाताई मुंडे यांनी हा प्रकार अत्यंत किळसवाणा आहे. यातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी करणारे ट्विट केले आहे.