जसप्रीत बुमराह अडकणार लग्नबंधनात! संजना गणेशनसोबत घेणार सात फेरे

0
32

टीम इंडियाचा यॉर्कर किंग समजल्या जाणारा जसप्रीत बुमराह लवकरच लग्नगबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येतीये. त्याने नुकतेच टी-20 मालिकेतून माघार घेतली आहे मात्र सु्ट्टी घेण्यामागचे कारण त्याने स्पष्ट केले नव्हते आता ते समोर येत असल्याचे दिसून येत आहे. बुमराहची होणारी जोडीदार कोण आहे हे मात्र सर्वांसाठी सरप्राईज उघडल्या सारखेच असणार आहे. जसप्रीत बुमराह स्पोर्ट्स प्रेझेंटेटर सजंना गणेशन हिच्याशी लगीनगाठ बांधणार असल्याची माहिती मिळाली आहे. सुरुवातीला बुमराहचं नाव दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्याशी जोडलं जात होतं. बुमराह या वीकेंडला म्हणजेच 13 किंवा 14 मार्चला गोव्यात संजना हिच्यासोबत सात फेरे घेणार आहे. संजना आणि बुमराह विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघेही यापूर्वी अनेकदा क्रिकेटशी संबंधित वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसले आहेत. परंतु त्यांच्या नात्याबद्दल कधीच कोणतीही माहिती माध्यमांसमोर आली नाही.