मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

0
43

महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावरुन त्यांनी ही माहिती दिली आहे. तब्येत उत्तम असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यांने पुढेचे उपचार चालू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेल्या काही दिवसात जे कुणी संपर्कात आले असतील त्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असेही त्यांनी आवाहन केले.

राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेचं आयोजन सध्या राज्यभरात करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परिवार संवाद यात्रेनिमित्त राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. मात्र आता ते क्वारंटाईन झाले असून बरे होईपर्यंत ते जनसंपर्क टाळणार आहेत.