अमेरिकेत ग्रीन कार्ड मिळण्याचा मार्ग मोकळा

0
28

अमेरिकेत राहणाऱ्या लाखो भारतीयांना आता ग्रीन कार्ड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लादलेल्या जाचक अटीतून नागरिकांची सुटका केली आहे. अमेरिकेच्या दोन्ही सभागृहात अमेरिकी नागरिकता बिल 2021 बिल पास झाल्यानंतर ते स्वाक्षरीसाठी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडे पाठवण्यात आले होते. त्यावर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वाक्षरी केल्याने अधिकृतरित्या राहण्याऱ्या भारतीयांना ग्रीन कार्ड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी लाखो भारतीयांसह H-1B व्हिसावर राहणाऱ्यांना आता अमेरिकेत राहण्याची परवानगी देण्यात आली होती.