प्रेयसीला आग लावण्याच्या नादात प्रियकराचा होरपळून मृत्यू

0
44

मुंबईतील जोगेश्वरीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याच्या प्रयत्नात असताना प्रियकरालाच आग लागली. यात प्रियकराचा जळून मृत्यू झाला आहे. तर प्रेयसीला उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृतीही गंभीर आहे. विजय खांबे असे मृत तरूणाचे नाव आहे.

विजय हा लक्ष्मी (बदलेले नाव) या तरुणीवर प्रेम करत होता. दोघांचे अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. यासाठी विजयच्या कुटुंबियांनी लक्ष्मीच्या घरच्यांना लग्नाचा प्रस्ताव दिला होता. मात्र लक्ष्मीच्या कुटुंबियांनी लग्नास नकार दिला. यामुळे व्यथित झालेल्या विजयने दारुच्या नशेत प्रेयसीला त्रास देण्यास सुरुवात केली होती. या त्रासाला कंटाळून लक्ष्मीने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. विजय जास्तच त्रास देत असल्याने लक्ष्मीने आठवड्याभरापूर्वी फिनाईल पिऊन जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर लक्ष्मी घरी आल्यानंतर विजय तिला भेटण्यासाठी गेला आणि सोबत जाळण्याच्या हेतून पेट्रोल घेऊन गेला. विजयने तिच्या तब्येतीची विचारपूस करत होता. दरम्यान त्याने संधीचा फायदा घेत खिशातून पेट्रोलची बाटली काढली आणि प्रेयसीवर टाकत आगा लावली. लक्ष्मी आगीत होरपळत असल्याचे पाहून विजयला दया आणि तिला वाचवण्याच्या नादात त्यालाच आगीने कवेत घेतले. या विजयचा जागीच मृत्यू झाला. तर अत्यवस्थ लक्ष्मीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरु आहे.