कंगनाने पुन्हा एकदा सरकारवर साधला निशाणा

0
28

राज्यातील आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या एका पत्रामुळे गृहमंत्री अनिल देशमुख आणि हे सरकार अडचणीत आले आहेत. महिन्याला 100 कोटी जमा करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला होता. या प्रकरणात अनेकांनी उडी घेतली आहे. विरोधकांनी तर अनिल देशमुख राजीनामा द्या किंवा हे सरकार बरखास्त करा, यासाठी तर भाजपाने आंदोलन केले आहेत.

परंतु आता यामध्ये अभिनेत्री कंगना रणौत हिनं देखील उडी घेत पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर “मी म्हणाले होते हे सरकार भ्रष्टाचारी आहे, येत्या काळात हे भ्रष्टाचारी महाराष्ट्र सरकार पूर्णपणे एक्सपोज होईल. मी केलेला दावा अखेर सिद्ध झाला आहे. मी हरामखोर नाही खरी देशभक्त आहे.” असं म्हणत निशाणा साधला आहे. तिच्या या ट्विट्समुळे सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.