कंगनाने दिग्दर्शक विजय यांना ‘देवता’ म्हणत मानले आभार

0
39

नेहमीच चर्चेत असलेली कंगना रणौत हिने दिग्दर्शक विजय यांच्यासाठी ट्विटरवर एक पोस्ट लिहून त्यांचे आभार मानले आहे. सध्या ती जयललिता यांच्या ‘थलायवी’ या बायोपिकमध्ये काम करत आहे. त्या दरम्यान कंगनाने ‘थलायवी’ च्या सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत.

तिने पोस्टमध्ये “विजय सर, थलायवीचं फक्त अर्धं डबिंग बाकी आहे. हा प्रवास आता संपत आहे त्यामुळे मी तुम्हाला आत्तापासूनच मिस करत आहे, असं मला लक्षात येतय. ”, असं लिहिले आहे.

तसेच “मी तुम्हाला कधीच रागावलेलं, अस्वस्थ झालेलं पाहिलं नाही. तुम्हाला ओळखणारे लोक जेव्हा तुमच्याबद्दल बोलतात तेव्हा त्यांच्याही डोळ्यात एक वेगळंच तेज दिसून येतं. तुमचे मनापासून आभार, मला तुमची आठवण येईल. तुमचीच, कंगना.” असं लिहित तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.