राम मंदिराच्या नावावर जर कोणी देणगी मागत असेल तर सावधान!

0
40

अयोध्येत राम मंदिर उभारणीकरीता देणगी मागणारे बरेच ठग देशात सध्या फिरत आहेत. राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी हवी असल्याचं सांगून, लोकांना बनावट पावती द्यायची आणि त्यांच्याकडून पैसै ऐठायचे, हा जणू काही धंदाच लोकांनी बनवला आहे. फसवणूक झाल्याचं कळताच काही लोकांनी पोलीस ठाण्याचे दरवाजे ठोठावले आहे. तक्रारदारांच्या तक्रारीवरुन पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. चंद्रपूर त्रिपाठी आणि अशोक राज या दोन जणांविरुद्ध कानपूर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली असून पोलीस आरोपींच्या शोधात आहेत.