चोरीत सराईत आरोपीचा कासारवडवडी पोलिसांनी १२ तासात लावला छडा

0
52

कासारवडवडीत इलेक्ट्रिकचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी १२ तासात अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल वापस घेतला असून उत्कृष्ठ कामगिरी केली.

काही दिवसांपूर्वी कासारवडवडीतील मंजि विरा यांच्या इलेक्ट्रिकच्या दुकानात सदर चोरट्याने मोठ्या सराईत पद्धतीने दुकानफोडी केली असून त्यामधून ५५ हजारांचा मुद्देमाल चोरी केला.याबाबद त्यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला असून यासाठी पोलिसांची एक टीम नेमण्यात आली.या टीमकडून १२ तासाच्या आत सदर चोरट्याचा छडा लावण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केले आहे.तसेच त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उत्कृष्ठ कामगिरी केली.