पंतप्रधान किसान योजनेशी जोडली केसीसी योजना! 

0
35

केंद्र सरकारकडून आता शेतीसाठी कर्ज घेणे अधिक सोपे केले आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी केसीसी-किसान क्रेडिट कार्ड योजना ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (KCC kisan credit card) सोबत जोडली गेली आहे. दोन्ही योजना एकत्र करून केसीसी बनविण्याची मोहीम सरकारने सुरू केलीय. त्याअंतर्गत आतापर्यंत 174.96 लाख अर्जांना मान्यता देण्यात आलीय. या अर्जांवर 1,63,627 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.केसीसी अंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंतची कर्जे फक्त 7% व्याजदराने मिळतात. आपण वेळेत पैसे परत केल्यास 3 टक्के सूट मिळते.