फसणुकीच्या आरोपाखाली खंडेलवाल मायलेकीला बेड्या

0
34

श्री तिरुपती बालाजी आणि शिपयार्ड कंपनीच्या नावाने अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी रागिनी आणि मानसी खंडेलवाल या मायलेकींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. अंधेरी गुन्हे शाखेने कारवाई करत या दोघींना अटक केली. या दोघींनी कंपनीच्या नावाने अनेक मोठ्या व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढले आणि गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मोठा परतावा मिळेल या आशेने मुंबई ठाण्यातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली. कंपनी जहाजासाठी आवश्यक पार्ट बनवते तसेच मोठ्या नामांकीत कंपनीचा यात सहभाग असल्याचे या दोघींना अनेकांना भासवले. याप्रकरणी पोलिसांना तक्रार मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून या दोघींना ताब्यात घेतले. चौकशीअंती या दोघींनी गुन्ह्याची कबुली दिली.