राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाल संपल्यानंतर काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खरगे यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडली आहे. काँग्रेसने राज्यसभेचे सभापती वैंकेया नायडू यांना याबाबतची माहिती दिली आहे. मल्लिकार्जुन खरगे यापूर्वी लोकसभेत काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना पक्षाने राज्यसभेत पाठवले होते.