‘मुंबईतील कोळीवाडे, गावठणांचे सीमांकन करा’, पालकमंत्री आदित्य ठाकरेंच्या सूचना

0
22

मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाडे आणि गावठणांच्या सीमांकनाबाबत राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. मुंबईतील उर्वरीत कोळीवाड्यांचे सीमांकन जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीत मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपनगर जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर यांच्यासह संबंधीत विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.