हाफकिन बायो फार्मा कार्पोरेशन निर्मित करणार कोविड लस

0
44

मुंबई : हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि हैद्राबाद येथील भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोविड लसीचे उत्पादन करण्यात येणार आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिली.
कोविड लसीच्या उत्पादनासाठी लस संशोधनाचा वारसा असणाऱ्या हाफकिन संस्थेने पुढे यावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिकडे केले होते. यामुळे मंत्रालयात घेण्यात आलेल्या बैठकीत अमित देशमुख यांनी याबाबद माहिती दिली.
हाफकिनमार्फत सुरु करण्यात येणाऱ्या लसीचे उत्पादन दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात भारत बायोटेक यांच्याकडील लस ठोक स्वरुपात घेण्यात येणार असून ती हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत रिपॅकिंग व फिलिंग करून आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देण्यात येईल.