कृष्णा हेगडे यांनी सोडले भाजपचे बंधन, ‘शिवबंधन’ बांधत शिवसेनेत केला प्रवेश 

0
53

मुंबईमध्ये (Mumbai)भाजपला (BJP)मोठा धक्का. मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी केलेला प्रवेश शिवसेनेच्या पथ्यावर पडेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.  कृष्णा हेगडे मूळचे काँग्रेसचे असून त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. 2009 मध्ये विलेपार्ले मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि जिंकले होते. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराग अळवणी यांनी त्यांचा पराभव केला. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्याशी वाद झाल्यानंतर त्यांनी 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
मनसेच्या 2019 विधानसभा उमेदवार जुईली शेंडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेने विलेपार्ल्यात भाजप आणि मनसेला दणका दिला आहे.

  • मुंबईमध्ये भाजपला मोठा झटका
  • माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिवसेनेत केला प्रवेश
  • मनसेच्या जुईली शेंडे यांचाही शिवसेनेत प्रवेश