कामगार अधिकार कार्यकर्ती नोदीप कौरला जामीन मंजूर 

0
32

दिल्ली-हरियाणाच्या सीमेवर कुंडलीमध्ये कामगारांच्या एका आंदोलनात सहभागी झालेल्या नोदीप कौर हिला अखेर शुक्रवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे.तिला १२ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती.ती सहभागी झालेले हे आंदोलन त्याच वेळी सुरू होते जेव्हा तीन नव्या केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. यातील पंजाब-हरियाणातून सीमेवर दाखल झालेल्या शेतकऱ्यांपैंकी अनेकांनी कुंडलीतही ठाण मांडले होते.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या दलित तरुणी नोदीप कौर हिला प्रशासनाकडून निशाणा बनवण्यात आल्याचा आरोप समर्थकांकडून करण्यात येत आहे. नोदीप कौर हिच्यावर हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाय खंडणी, चोरी, दंगल भडकावणं, बेकायदेशीर जमावात सहभाग घेणे तसेच धमकीचा आरोप होता.