वृद्ध आई वडिलांचा सांभाळ न करण्याऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापला

0
24

लातूर: लातूर जिल्हा परिषदेने 10 नोव्हेंबरला ऐतिहासिक ठराव पास केला होता. त्यात वृद्ध आई वडिलांचा सांभाळ न करण्याऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून 30 टक्के रक्कम कापली जाईल असा निर्णय घेण्यात आला होता. या ठरावानुसार सात कर्मचाऱ्यांच्या पगारातून 30 टक्के रक्कम कापली गेलीय. ही रक्कम आई-वडिलांच्या खात्यात दरमहा जमा केली जाणार आहे. दोषी कर्मचाऱ्यांच्या पगारातून डिसेंबर 2020 पासून पगार कापला गेला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल बोंड्रे यांनी शनिवारी याबाबतची माहिती दिली.