‘राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले’ – विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर

0
34

राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले याविषयी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी सवांद साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्राची प्रतिमा मलीन या सरकारच्या कालावधीत झाली आहे. तसेच रक्षकचं भक्षक झाल्याचे चित्र आज दिसून येतय. पोलिसांवर सरकारचा दबाव राहिलेला नाही आहे,  हे पुन्हा सिद्ध झालं आहे. सध्या घडलेली जळगाव मधली घटना दुर्दैवी आहे. सरकारला लाज वाटत नाही.

तसेच ते म्हणाले कि, उस्मानाबादमध्ये बंदुकीच्या धाकावर महिलेवर बलात्कार केला, त्यांनतर त्या महिलेने आत्महत्या केली.  जनाची नाहि तर मनाची लाज असेल तर तात्काळ गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. जनतेचा संयमाचा भान फुटण्याच्या अगोदर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. नाहीतर जनता त्याचप्रमाणे सरकारला उत्तर देईल. दुर्दैव आहे हे महाराष्ट्राचं. सरकार मधला मंत्री जेव्हा आरोपी म्हणून जनतेच्या मनात संशय व्यक्त केला जातो. सरकारकडे संशयाने पाहून नाव घेतलं जात आहे.

प्रशासनावर विश्वास आता राहिला नाही. पोलीस, डॉक्टर या ठिकाणी गुंतलेलं दिसून येत आहे. सरकारच कुठलंही नियंत्रण प्रशासनावर नाही आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला दिसून येत आहे. सभागृहात २६० चा पक्षाचा प्रस्ताव आज मांडणार आहे, त्यात law and order वर चर्चा आम्ही घेणार. जे गुन्हेगारी स्वरूप महाराष्ट्राला प्राप्त झालं आहे, त्याच्यावर सरकारला धारेवर धरायचं काम भाजप आज करणार आहे.

अशाप्रकारे अंतर्गत युद्धातून सरकार कुऱ्हाड मारून घेणार अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.