कृषि योजनांसाठी प्रथमच ऑनलाईन सोडत – कृषिमंत्री दादाजी भुसे

0
46

महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नुकतीच प्रथमच ऑनलाईन सोडत काढण्यात आली. त्याद्वारे राज्यातील 2 लाख शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. पारदर्शकरित्या ही निवड प्रक्रिया पार पडली. यांत्रिकीकरण, सूक्ष्मसिंचन, विशेष घटक योजना, नविन विहिरी आणि फलोत्पादनाच्या विविध बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. ज्यांची निवड झाली आहे त्यांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात येणार आहे.