‘पुढच्या महिन्यात भ्रष्टाचाराला रोखणारी लस देऊया’, कोरोनाची लस घेत कमल हासन यांचा टोला

0
47

कोरोनाचा प्रादृभाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हे संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झालीये. या टप्प्यात 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण होणार असून अनेक नागरिकांनी लस घेतली आहे. या दरम्यान प्रसिद्ध अभिनेते कमल हासन हे देखील या मोहिमेत सहभागी झाले असून त्यांनी कोरोनाची लस घेतली अन् इतरांना देखील ही लस घेण्यासाठी प्रोत्साहित केलं.

हि माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली, तसेच “श्री रामचंद्र या रुग्णालयात मी कोरोना विषाणूला रोखणारी लस घेतली असून, जे लोक इतरांची पर्वा करतात त्यांनी ही लस घेणं गरेजेचं आहे. तसेच, सर्वांनी कोरोनापासून स्वत:च्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी COVID 19 ची ही लस घ्यावी. आता करोनाला रोखणारी लस घेऊया अन् पुढच्या महिन्यात भ्रष्टाचार रोखणारी लस देऊया” असे ट्विट त्यांनी केलं आहे. सोबतच त्यांनी लस घेतानाचा एक फोटो देखील शेअर केला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.