शिवजयंतीपूर्वी रायगडावर रोषणाई करण्याचं खा. श्रीकांत शिंदे यांचं आश्वासन

0
439

खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज रायगड किल्ल्याचा दौरा करून, पाहणी केली. यावेळी त्यांनी शिवजयंतीपूर्वी स्वनिधीतून रायगडावर रोषणाई करण्याचं आश्वासन दिलं. तसेच शिवजयंतीला रायगड 48 तास खुला राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाड ते रायगड दर्जेदार रस्ता तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.