गुजरातच्या जूनागडमध्ये सिंह शहरात घुसण्याचे प्रकार रोजच होत आहेत. नुकताच एका हॉटेलमध्ये सिंह घुसल्याची घटना समोर आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओत सिंह हॉटेलच्या मेन गेटवरून उडी मारून जाताना दिसत आहे. ही घटना तिथल्या सुरक्षारक्षकाने पाहिली, मात्र बाहेर येण्याची हिम्मत करु शकला नाही. ही घटना 8 फेब्रुवारीला सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.