Live:उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा! आठवडाभरात एमपी एससीची परीक्षा होणार 

0
39

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलली होती .राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. राज्य शासनानं परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थ्यामंध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाले आहे.लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा विरोध करत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार देखील केला आहे. एमपीएससी परीक्षेबाबत आजच निर्णय होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. मुख्यमंत्र्यांशी याविषयासंदर्भात चर्चा झाली आहे. परीक्षा पुढं ढकलणं हा निर्णय 80 टक्के विद्यार्थ्यांवर अन्याय करणारं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परस्पर तारखा जाहीर केल्या. कोरोनासंदर्भात काळजी घेण्यासाठी कमी वेळ लागेल. मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करत आहेत.