Live: कोरोनासंदर्भात पीएम मोदींची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक , म्हणाले ‘पुन्हा एकदा आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होतीये’

0
18

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संध्याकाळी देशातील कोरोनाच्या परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले, पुन्हा एकदा एक आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होत आहे. मी समजून घेऊ शकतो की एका वर्षानंतर कोरोनासोबतच्या लढाईनंतर थकवा किंवा हलगर्जीपणा येऊ शकतो.
अनेक राज्यांत प्रशासन आळशी पद्धतीने काम करतांना दिसत आहे आणि यामुळे कोरोनाचे प्रकरणे वाढत आहेत, पुन्हा युद्धपातळीवर काम करणे आवश्यक झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्फ्यू रात्री 9 वाजता किंवा रात्री 10 वाजता लावल्यास चांगले होईल जेणेकरुन सकाळी उर्वरित काम होऊ शकतील.


पूर्वीपेक्षा कोरोनाशी सामना करण्यासाठी आपल्याकडे चांगली संसाधने आहेत. आता आपला जोर मायक्रो कंटेन्ट झोन तयार करण्यावर असायला हवा. नाईट कर्फ्यूऐवजी कोरोना कर्फ्यू हा शब्द वापरा म्हणजे जागरूकता कायम राहील. यावेळी देशातील कोविड संसर्गाची वाढ पूर्वीपेक्षा झपाट्याने होत आहे. आपल्या सर्वांसाठी ही चिंतेची बाब आहे. या वेळी लोक पूर्वीपेक्षा खूप निष्काळजी झाले आहेत.

Leave a Reply