Live: पंतप्रधान मोदी दोन दिवसीय बांग्लादेश दौऱ्यावर ,VVIP विमानाचा परदेशी दौऱ्यासाठी पहिल्यांदा वापर

0
37

पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा दोन कारणांमुळे खास मानला जात आहे. पहिलं कारण कोरोना काळातील पंतप्रधान मोदींचा हा पहिला परदेश दौरा आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे भारताचं नवं व्हीव्हीआयपी (VVIP) विमान एअर इंडिया-1 पहिल्यांदाच परदेशातील दौऱ्यासाठी वापरण्यात आलंय. ऑक्टोबर 2020 मध्ये हे विमान भारतात दाखल झालं.मोदी खास व्हीव्हीआयपी विमानानं बांगलादेशची राजधानी ढाका येथे पोहचले. या ठिकाणी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी स्वतः विमानतळावर हजर राहून मोदींचं स्वागत केलं. या दौऱ्यात दोन्ही देशातील सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. या दौऱ्यात मोदींच्या सुरक्षेवर अधिक भर देण्यात आलाय. त्यामुळेच पहिल्यांदाच परदेश दौऱ्यासाठी बोइंग 777 (Boeing 777) विमानाचा वापर झालाय. या विमानाचा पहिल्यांदा वापर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली ते चेन्नई प्रवासासाठी केला होता.