Live: परमबीर सिंग यांच्या आरोपात तथ्य नसल्याने अनिल देशमुखांचा राजीनामा होणार नाही-शरद पवार

0
31

अँटिलिया समोर ठेवण्यात आलेली स्फोटके, मनसुख हिरन यांचा संशयास्पद मृत्यू, सचिन वाझे यांना अटक आणि परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पुरतं घेरलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.यावर शरद पवार पुन्हा पत्रकार परिषद घेत आहेत.यामध्ये शरद पवार म्हणाले ‘परमबीर सिंग यांच्या आरोपात तथ्य नाही, त्यामुळे अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही.मुख्य प्रकरण हे अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी पार्क करण्याचं आहे यामध्ये चौकशी व्हावी.

काल एटीएसने दोघांना अटक केली, हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात ही अटक झाली आहे, यावरुन एक स्पष्ट होत आहे, हिरेन यांची हत्या का झाली त्यांची हत्या करणारे जे पोलीस वाटतात, त्यांना एटीएसने अटक केलीआता तपासात सत्य बाहेर येईल .उद्या-परवा कधी येईल माहिती नाही.मात्र मला आनंद आहे, मुख्य केस जे सीपींच्या आरोपानंतर दुर्लक्षित होत होती, अंबानीच्या घराबाहेर स्फोटकांची, त्याबाबत चौकशी होत आहे