Live: भाजपचे राज्यात गलिच्छ राजकारण, उद्धव ठाकरे यांचा विरोधकांवर निशाणा

0
27

मुंबई: संजय राठोड यांनी पुजा चव्हाण प्रकरणात मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांच्या मंत्रिदावर भाष्य केले आहे.सध्या ते लाईव्ह पत्रकार परिषद घेत आहेत यादरम्याम ते म्हणाले ‘भाजपकडून राज्यात गलिच्छ राजकारण सुरु आहे’ तसेच ते पुढे म्हणाले ‘ राजीनामा घेणे, गुन्हा दाखल करुन मोकळे होणे म्हणजे न्याय देणे नव्हे. या प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणाने व्हावा ही भूमिका आमची आहे. जे तपासातून समोर येईल त्यानुसार कारवाई होईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेली त्यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले. राठोड प्रकरणाचा तपास नीट होऊ द्या. चौकशी होऊ द्या. केवळ आदळआपट करू नका. आज तुम्ही ज्या तपास यंत्रणेवर अविश्वास दाखवत आहात तीच यंत्रणा आताही काम करत आहे.ते पुढे म्हणाले की तुम्ही सोबत असाल तर प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. नुसते आरोप करने म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात असल्याचे ते म्हणाले.