Live- India vs England 2021, 1st odi: टीम इंडिया इंग्लंडवर वरचढ… 

0
36

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिल्या एकदिवसीय सामना खेळला जातोय. टीम इंडियाने सध्या दोन विकेट गमावल्या आहे. सलामवीर रोहित शर्मा आऊट झाला आहे. बेन स्टोक्सने रोहितला विकेटकीपरच्या हाती कॅच आऊट केलं.  रोहित आऊट झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला आहे. ही पहिली वनडे पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया प्रथम बॅटिंग करत आहे.शिखर धवन आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. भारताला रोहित शर्माच्या रुपात 64 धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर शिखर आणि विराटने दोघांनी डाव सावरला. या दरम्यान दोघांनी फटकेबाजी केली.कर्णधार विराट कोहलीने 50 चेंडूत 100 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केलं आहे.