महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर निर्णय

0
59

विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढायला पुन्हा सुरवात झाली आहे. कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता महाराष्ट्र राज्यातील तीन जिल्ह्यांनी कोरोना परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कडक निर्णय घेतले आहेत.विदर्भातील अकोला, यवतमाळ व अमरावती या तीन जिल्हात पुन्हा लॉकडाऊन लागले आहे. यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे, नाशिक, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला आणि बुलढाणा अशी या जिल्ह्यांची नावे असून या आठ जिल्ह्यांमधील सरासरी कोरोना वाढीची प्रकरणे पाहता या जिल्ह्यांत कोरोना प्रकरणात 8 टक्के वाढ दिसून आली आहे.

  • अमरावती, अकोला, यवतमाळमध्ये पुन्हा लॉकडाउन जाहीर
  • शनिवारी रात्री ते सोमवारी सकाळी 8 पर्यंत कर्फ्यु
  • यवतमाळमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत नाईट कर्फ्यू