नागपूरमध्ये २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर 

0
24

नागपूर: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आले.तसेच काही ठिकाणी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत आता विदर्भातील नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली.नागपूरमध्ये 15 ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात येईल, असं नितीन राऊत म्हणाले. “नागपुरातच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण आढळून येत आहेत. शनिवार-रविवार बंद म्हणजे मिनी लॉकडाऊन लावण्यात आले होते.मात्र याचा काहीही परिणाम झाला नाही.त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून मद्य विक्री बंद राहील. लसीकरण सुरू राहील. अत्यावश्यक सेवा सुरू राहील. डोळ्यांचे दवाखाने आणि चष्म्याचं दुकान सुरू राहील, असं नितीन राऊत म्हणाले.