कोरोनामुळे बुलडाण्यात संचारबंदी लागू; शाळा, महाविद्यालयं बंद

0
26

कोरोना रुग्णांच्या संख्या झपाट्याने वाढत असल्याने बुलडाणा जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयं 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शिवजयंतीच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत. लग्न समारंभाला 50 जणांची मर्यादा घालून देण्यात आली आहे.

यापूर्वी अकोल जिल्हाधिकाऱ्यांनी 15 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. अकोला येथे शाळा, महाविद्यालय पुन्हा बंद करण्यात आले असून तेथे मिरवणूक तसेच उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. अमरावती येथेही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता बुलडाण्यातही संचारबंदी लागू झाल्याने शिवप्रेमींच्या उत्साहावर विरजण पडले आहे.