संसर्ग थांबविण्यासाठी लॉकडाऊन फारसा परिणामकारक नाही, केंद्र सरकारचे म्हणणे

0
38

राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र यासंदर्भात केंद्राने महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून नाईट कर्फ्यू आणि नव्याने लागू केलेला लॉकडाऊन परिणामकारक नसल्याचे सांगितले आहे.

त्याचबरोबर वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी एखादी व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली, तर तिच्या संपर्कातील २० ते ३० जणांचा शोध घेण्याची गरज आहे, असे केंद्राने सांगितले आहे. तसेच जे लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत आणि घरातच विलगीकरणात आहेत, त्यांचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे, असेही केंद्राने राज्य सरकारला म्हटले आहे.