महाराष्ट्र विधानसभा : थेट प्रक्षेपण

0
53

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्च या दिवशी मांडला जाणार आहे. तसेच 10 मार्चला अधिवेशन संपणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर दिले आहे. तसेच आज विधानसभेत राज्यपालांनी मराठीमध्ये भाषण केलं हि महत्वाची बाब आहे.

तसेच आज भाजप नेते शेतकरी नुकसान भरपाई मुद्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील अतिवृष्टी आणि अवकाळी पावसानं झालेल्या नुकसान भरपाईचा मुद्दा मांडला आहे.

विधानसभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह :

 • कोरोना म्हणतो की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन… कोरोना हा विषाणू आहे, असं सांगून मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसांना चांगलाच टोला
 • पेट्रोल आणि डीझेलच्या दरवाढीवरून मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला लगावला टोला
 • सुधीर भाऊ भाषण करत असताना मला नटसम्राट पाहत असल्याचा भास झाला
 • मी माझ्या महाराष्ट्रासाठी बांधित आहे
 • केंद्र सरकारला आणि भाजपाला मुख्शयमंत्र्यांचा इशारा, देश म्हणजे तुमची खासगी मालमत्ता नाही
 • लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 • विदर्भ वेगळा होऊ देणार नाही, विदर्भासह संपूर्ण राज्याचा विकास होणार
 • बाळासाहेबांच हिंदुत्व लक्षात ठेवा
 • मुख्यमंत्र्यांचा भाजपवर घणाघात, शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नका, हिंदुत्व शिकवण्याची तुमची पात्रता नाही
 • नशीब सायकलमध्ये हवा भरण्याचे दर वाढविले नाही
 • बंद दाराआड ठरलेलं तुम्ही बाहेर नाकारलं, मुख्यमंत्र्यांचा फडणवीस आणि शाहा यांना टोला
 • महाराष्ट्राची बदनामी करू नका
 • महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणली आहे, राज्यातील गुंतवणूक आभासी नाही
 • खोट बोलून सत्ता टिकत नाही, मुख्यमंत्र्यांचा मोदीसरकारवर टीका
 • सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे देशद्रोह नाही
 • तुम्ही अविश्वास दाखवला तरी, माझा स्वतःवर विश्वास आहे
 • कोविडची परिस्थिती जगभर आहे त्यावरून राजकारण नको