देशात कोरोनाच्याबाबतीत महाराष्ट्राची स्थिती गंभीर

0
37

देशातील कोरोनाबाबत सर्वात वाईट परिस्थिती असलेलं राज्य हे महाराष्ट्र दिसून येत आहे, कारण राज्यात रविवारी 4092 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढलेलं सध्या महाराष्ट्र देशात सध्या एकमेव राज्य आहे. रविवारी नवीन 1355 कोरोनाबाधीत रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1975603 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 35965 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.7वर गेलं आहे.