महाराष्ट्रात पंतजलीच्या कोरोनील औषध विक्रीवर बंदी

0
30

महाविकास आघाडी सरकारने राज्यात बाबा रामदेव यांच्या कोरोनील औषधावर बंदी घातली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि आयएमए या आरोग्य संघटना जिथपर्यंत याला मान्यता देत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात या औषधाच्या विक्रीवर बंदी असेल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनीलवर आयएमएने प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दूसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने पंतजली आयुर्वेद कोरोनीला कोणतीही मंजुरी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कोरोनावर प्रभावी उपचार म्हणून गेल्या शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हर्ष वर्धन यांच्या उपस्थितीत बाबा रामदेव यांनी कोरोनील औषधाचं लॉन्चिंग केले. त्यानंतर याला जागतिक आरोग्य संघटना आणि 154 देशांची मंजुरी असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने या दाव्याचे खंडन केले. त्यामुले बाबा रामदेव यांच्या औषधावरुन पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे.