राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विरोधात महाराष्ट्र सरकार करणार कायदेशीर कारवाई

0
516

महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अन महाविकास आघाडी सरकारमधील नाती आणखी खराब होऊ शकतात. ठाकरे सरकारने राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना पाठविलेल्या 12 नावांना मंजूर न करण्याच्या प्रकरणावरून आघाडी सरकार राज्यपालांविरोधात कायदेशीर पावले उचलण्याच्या विचारात आहे. ठाकरे मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात विधानपरिषदेच्या सदस्याला उमेदवारी देण्याची शिफारस केली होती. परंतु कित्येक महिन्यांनंतरही राज्यपाल कोश्यारी यांनी या नावांना सहमती दिली नाही.या प्रकरणात ठाकरे सरकारने अनेकदा राज्यपालांना रिमाईंडर सुद्धा पाठविले आहे.

  • राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अन महाराष्ट्र सरकारमध्ये वाद
  • राज्यपालांना पाठविलेल्या 12 नावांना मंजूर न करण्याचे प्रकरण
  • राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विरोधात महाराष्ट्र सरकार करणार कायदेशीर कारवाई
  • राज्यपालांना अनेकदा पाठवले रिमाईंडर