महाराष्ट्रात कोरोनाची दूसरी लाट?

0
28

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा पाहता पुन्हा चिंता वाढली आहे. वाशिम जिल्ह्यात 318 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासन खडबडून जागं झाले आहे. या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये देवांग येथील हॉस्टेलमधील 190 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी अमरावती जिल्ह्यातील विविध भागातून आले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाची दूसरी लाट अमरावतीतून सुरु झाल्याचे बोललं जात आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 8,807 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 18 ऑक्टोबरनंतर सर्वाधिक रुग्णांची नोंद आहे. तर 80 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 56 दिवसातील ही सर्वाधिक मृत्यूची नोंद आहे. यापूर्वी 30 डिसेंबरला 90 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मुंबईतही कोरोना वेगाने पसरत असल्याचे चित्र आहे.