विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

0
30

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार 8 मार्चला सादर करणार आहे. त्यामुळे राज्यावरील वाढता कर्जाचा बोजा आणि लॉकडाऊनमुळे घटलेल्या उत्पन्न पाहता विरोधक सरकारला धारेवर धरणार आहे. राज्याची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी अजित पवार कोणत्या उपाययोजना करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
केंद्र सरकारकडून जीएसटीचे 29 हजार कोटी आणि पुनर्वसनाचे 4 हजार 700 कोटी येणे बाकी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. इंधन दरवाढीवर विरोधक का बोलत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला.