दहावी, बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

0
14

महाराष्ट्र बोर्डाच्या एप्रिल-मे 2021मध्ये घेण्यात येमाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीच्या लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत असणार आहेत. तर दहावीच्या लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत असणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे यंदा परीक्षा लांबणीवर गेल्या आहेत. दरवर्षी परीक्षा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पार पडत होत्या. मात्र यंदा या परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यात होणार आहेत. या नंतर राज्य मंडळाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. हे वेळापत्रक मंडाळाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.