क्रिकेटपटू, अभिनेत्यांच्या ‘त्या’ ट्विटची होणार चौकशी!

0
44

मुंबई- कृषी कायद्याच्या समर्थनार्थ क्रिकेटर्स आणि अभिनेत्यांनी केलेल्या ट्विटनंतर देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. आता क्रिकेटपटू आणि अभिनेत्यांनी केलेल्या ट्विटची महाराष्ट्र पोलीस चौकशी करणार आहेत.

आंतराष्ट्रीय स्तरावर शेतकरी आंदोलनाची दखल घेतल्यानंतर क्रिकेटपटू आणि अभिनेत्यांनी आपली मते मांडली होती. मात्र या ट्विटनंतर काँग्रेसने काहीतरी कट शिजत असल्याचा आरोप केला. त्याचबरोबर काँग्रेस शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत चौकशीची मागणी केली होती.

‘क्रिकेटपटूंचे वैयक्तिक मत असेल तर चालेल, मात्र त्यामागे भाजपाचा हात असेल तर हे प्रकरण गंभीर आहे’ असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता.

सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, लता मंगेशकर, अक्षय कुमार यांनी रिहाना खडे बोल सुनवत ट्विट केले होते