मविआ सरकारची वर्षपूर्तीनंतर जोरदार जाहीरात

0
52

महाविकास आघाडीचं सरकार जास्त दिवस टिकणार नाही असा वेळोवेळी विरोधकांनी विश्वास प्रकट केला होता. मात्र विरोधकांच्या याच विश्वासाला खोटं ठरवत मविआ सरकारनं आपलं एक वर्ष पूर्ण केलं. मविआ सरकारनं आपल्या एक वर्षपूर्तीनिमित्त एक व्हिडिओ शेअर करत एक जोरदार जाहीरात केली आहे. कोरोना काळातही सरकार किती खंबीरपणे उभं होतं हे या व्हिडिओतून सांगण्याचा सरकारचा उद्देश आहे. “अतिवृष्टी, कोरोना आणि कित्येक तरी आव्हानं आली मात्र शेती आणि विकास थांबला नाही”, असं सरकारनं व्हिडिओतून सांगितलं आहे. ‘महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणारही नाही’, हा हॅशटॅग देत सरकारनं आपलं सरकार किती खंबीर आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.