मुबंई-पुणे एक्सप्रेस-वेवर विचित्र अपघात; 5 जण ठार

0
60

मुबंई-पुणे एक्सप्रेस-वेवर विचित्र अपघात झाला आहे. पुण्याकडुन मुंबईच्या दिशेने जात असताना बोरघाट उतरताना फुडमॉलजवळ हा अपघात झाला. या भीषण अपघातात 5 जणांनी आपला जीव गमावला असून, इतर 5 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका पाच वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. वाहनांची एकमेकांना धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.