जळगावात ट्रक पलटी झाल्यानं 15 मजूर ठार

0
42

जळगावातील यावल तालुक्यात पपईचा ट्रक पलटी झाल्याने 15 मजुरांनी आपला जीव गमावला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातग्रस्त 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय तर मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्यावरील एका वळणावर ट्रक चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती आणि मदतकार्य सुरु केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.