बारमध्ये बिल पेमेंट करताना ग्राहकाला एटीएमसोबत पिन नंबर देणं पडलं महागात

0
29

बिल भरताना बारमधील कर्मचारी ATM कार्ड क्लोन करत असल्याचा धक्कादायक प्रकार मालाडमध्ये समोर आला आहे. तक्रारदाराच्या एटीएम खात्यातून 20 हजार रुपयांच्या पाच व्यवहारातून परस्पर 1 लाख रुपये काढून घेतल्याची प्रकरणी डिसेंबरमध्ये 2020 मध्ये मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार व्यक्ती बिहारला गेली नसतानाही त्याच्या बिहारमधील एका ATM मधून त्याच्या अकाऊंटवरुन रक्कम काढण्यात आली होती. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना कार्ड क्लोनिंगचा संशय आला आणि तपासानंतर एका टोळीस मालाड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक डेबिट कार्ड आणि स्कीमर डिव्हाईस जप्त करण्यात आले आहे.