मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडलेल्या परिसरात आढळला दुसरा मृतदेह, मात्र अधिका-यांचे स्पष्टीकरण

0
27

मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्या परिसरात सापडला तिथे आता दुसरा मृतदेह आढळल्याने चर्चेला उधान आले आहे. मुंब्रा रेतीबंदर येथे आणखी एक मृतदेह सापडल्याने गोंधळ उडाला आहे. मात्र काही वेळापूर्वी तेथील अधिकारी मधुकर करपे यांनी सांगितले कि, तो मृतदेह एका कामगाराचा आहे, त्याचा पाय घसरून मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केल आहे.

त्या व्यक्तीचे नाव सलीम अब्दुल शेख असून तो 48 वर्षाचा आहे.  मुंब्रा पोलीस, पालिका आणि फायर ब्रिगेडचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.