मनसुख हिरेनप्रकरणी 2 जणांना अटक

0
28

सध्या महाराष्ट्रातील राजकारणात एका पत्रामुळे खळबळ माजली असून, त्यातच मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी एटीएसच्या पथकाने दोन जणांना अटक केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.ज्या व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अद्याप त्यांची नवे समोर आली नाही.

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी या दोघांना आज ठाणे न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसेच या दोघांच्या अटकेमुळे मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा छडा लागण्याची शक्यता आहे.