मराठा आरक्षणावर आज मुंबईत महत्त्वाची बैठक

0
41

मराठा आरक्षणाचा तोडगा काढण्यासाठी आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. खासदार उदयनराजे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मराठा आरक्षणावर चर्चा करणार आहेत. या बैठकीला मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य आणि सरकारचे कायदेविषयक सल्लागार यांची उपस्थिती असणार आहे. सह्याद्री अतिथिगृहावर दुपारी 4 च्या सुमारास ही बैठक पार पडणार आहे.

येत्या काही दिवसात मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होणार आहे. दूसरीकडे मराठा आरक्षणावर कोर्टाकडून लावण्यात आलेली स्थगितीबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे चर्चेनंतर तांत्रिक बाजू सुप्रीम कोर्टात कशी मांडणार यावर बैठकी खलबतं होणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे मराठा समाजाचं लक्ष लागून आहे.

गेल्या काही दिवसांत उदयनराजे यांनी राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा केली आहे.