मराठा आरक्षणावर प्रत्यक्ष सुनावणी 8 मार्चपासून

0
44

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीला 8 मार्चपासून सुरुवात होणार आहे. राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात प्रत्यक्ष सुनावणीची मागणी करण्यात आली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने 8 मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होईल असे स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टात सुनावणी 8 मार्च ते 18 मार्चदरम्यान पार पडणार आहे. 8 मार्चपासून 10 मार्चपर्यंत याचिकाकर्त्यांना युक्तिवाद करण्याचा अवधी दिला आहेत. तर 12 मार्चपासून 17 मार्चपर्यंत राज्य सरकार आपली बाजू मांडणार आहे. 18 मार्च नव्या मुद्द्यांवर सुनावणी होणार असून केंद्र सरकारची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे 8 मार्च ते 18 मार्च या दहा दिवसांच्या कालावधीत संपूर्ण सुनावणी पार पडणार आहे.