Live: मराठी भाषा गौरव दिन सोहळा

0
39

आज संपूर्ण जगभरात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा होत आहे.27 फेब्रुवारी मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांची जयंती. वि. वा. शिरवाडकर उर्फ  कवी कुसुमाग्रज यांना साहित्य विश्वातला मानाचा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ प्राप्त झाल्यानंतर त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’  म्हणून साजरा केला जाऊ लागला. प्रत्येक मराठी माणसासाठी अभिनामाचा असणारा हा दिवस. या दिवशी राज्य सरकार, विविध संस्था यांच्याकडून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाअंतर्गत मराठीची गोडी सर्वदूर पसरावी यासाठी उपक्रम राबवले जातात.
“मराठी भाषा गौरव” दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (26 फेब्रुवारी) रोजी परिसंवादाचे ऑनलाईन उद्घाटन केले.मराठी भाषेबद्दल प्रेम आणि आदर असून आपण मराठी भाषा जपली पाहिजे असे मुख्यमंत्री आजच्या कार्यक्रमात म्हणत आहेत. याचे लाईव्ह प्रक्षेपण त्यांनी ट्विटर वर शेअर केले आहे.