मराठी टिक टॉक स्टार समीर गायकवाडची आत्महत्या, सोशल मीडियावर लाखो फॅन्स

0
33

पुणे: सोशल मीडियावर टिक टॉक स्टार म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या समीर गायकवाड याने रविवारी संध्याकाळी आत्महत्या केली. पुण्यातल्या राहत्या घरी गळफास घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवली. घटनास्थळावरून कुठल्याही प्रकारची सुईसाईड नोट मिळाली नाही मात्र प्रेमकरणातून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
शहरातील वाघोलीच्या केसनंद फाट्यावरील मिकासा सोसायटीत टिकटॉक स्टार समीर मनीष गायकवाड (वय 22) राहतो. आपल्या राहत्या घरी रविवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्याने पंख्याला साडीच्या मदतीने गळफास लावून आपल्या आयुष्याचा दुर्दैवी शेवट केला.यामुळे सोशल मीडियावर फॅन्स मोठ्या प्रमाणात दुःख व्यक्त करत आहेत.

https://www.instagram.com/reel/CLieP3vpJ7S/?igshid=14c4cz10jhnvi